ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र फॅशन शो करीता प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार २४सप्टेंबरला गडचिरोलीत
ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र फॅशन शोला प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार २४ सप्टेंबरला गडचिरोलीत गडचिरोली (अशोक खंडारे):- आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात जे.टी.एम. स्टार इव्हेंट आयोजित "ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र" सीझन -२ ही स्पर्धा सुमानंद हॉल गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या पुरस्कार सोहळ्यात फॅशन शो, मॉडेलिंग स्पर्धा, मेकअप आणि मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून मॉडेलिंग, कला, समाजसेवा, साहित्य, कृषी, राजकीय, इत्यादी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला स्पर्धेतील कलाविष्कारांचे आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री तसेचं प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे त्यांनी मराठी, हिंदी, कन्नड चित्रपटात काम केले असून अप्सरा आली या रिऍलिटी शो च्या त्या विजेत्या आहेत. रानबाजार, देवमाणूस, लंडन मिसळ, तुझ्यात जीव रंगला या सारख्या प्रसिद्ध मालिका मध्ये त्यांनी काम केलं आहे. या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक ज्योती उंदीरवाडे (चव्हाण) या असून दि...