अनखोडा येथील अभ्यासीकेची इमारत गळतीमुळे अभ्यासांची पुस्तकांची नुकसान, ग्रामपंचायत यांनी दुरुस्तीकडे द्यावे लक्ष - विद्यार्थी यांची मागणी
अनखोडा येथील अभ्यासिकेची इमारत गळतीमुळे अभ्यासांची पुस्तकांची नुकसान, ग्रामपंचायत यांनी दुरुस्तीकडे द्यावे लक्ष - सक्षम युवा संघटनेची मागणी
आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील सार्वजनीक वाचनालय अनखोडा येथील होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासीका सुरू आहे मात्र पावसाच्या पाण्यामुळे सर्व छत गळत असून त्याचे पाणी संपूर्ण अभ्यासीका ,वाचनालयामध्ये ठिपकत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सर्व पुस्तके तसेच महत्त्वाच्या इतर वस्तू टेबल व खुर्चा देखील ओले होत आहेत, त्यामुळे मोलमजूरी करणाऱ्या गोर-गरीबांची मुलं कठीण परिस्थितीत असतांना सुद्धा, पुस्तकांची खरेदी करतात. पण अशा या ठिबकणाऱ्या छताच्या पाण्यामुळे सर्व पुस्तकांची खराबी झाली आहे, त्यातच खाली फरशिवर सुद्धा गळलेले पाणी साचून राहाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यात खूप अडचण निर्माण होत आहे तर काही मुले घसरुन पडण्याचे प्रकार घडले आहेत. तरी इमारतीकडे थोडं लक्ष केंद्रीत करून इमारतीची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवावे
तसेच जि.प. कन्या शाळा व समाज मंदिराच्या पटांगणावर जास्त प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहात असून, तेथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना तसेच गुरुजन वर्गाला देखील खूप जास्त प्रमाणात कसरत करून रस्ता पार करावा लागत आहे. तरी सुद्धा त्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लाऊन आमच्या अडचणी दूर करण्यात यावी, अशी सर्व विद्यार्थी वर्ग, गुरुजन वर्ग, तसेच सक्षम युवा संघटना यांच्या तर्फे अनखोडा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना विनंती अर्ज देण्यात आले. सक्षम युवा संघटनेकडून दिलेल्या विनंती अर्जाची ग्रामपंचायत प्रशासनान दखल घेणार का? याकडे अनखोडा ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.