प्रियांकाच्या मृत्यू नंतर पराग यांचे संबंध असलेली पल्लवी वैरागडवार हिला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
प्रियांकाच्या मृत्यूनंतर पराग यांचे संबंध असलेली पल्लवी वैरागडवार हिला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
आष्टी:-
आष्टी येथील प्रियंका पराग कुंदोजवार हिने आपल्या राहत्या घरी बेडरूममध्ये गळफास घेऊन दि १४ ऑगस्ट २०२५ ला सकाळच्या सुमारास आत्महत्या केली होती. तिची आई सुवर्णा अनंता कत्रोजवार रा. गडचिरोली यांनी आष्टी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलीसांनी तिचा पती पराग कुंदोजवार याला शनिवारी अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. दिनांक १८ सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी कुंदोजवार कुटूंबातील सहा जणावर गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आष्टी पोलिसांनी दिली आहे.
पती पराग कुंदोजवार यांनी पल्लवी सुरेश वैरागडवार रा. नागपूर हिचेसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे शारिरीक, मानसीक त्रास देऊन मारहाण, करण्यास प्रवृत्त केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. आष्टी पोलिसांनी अपराध क्र. २१८ /२०२५ कलम ८५, १०६, ११५(२), शिवीगाळ व छळ करुन कुरतेची ३५२,३ (५) बि. एन. एस. - २०२३
नुसार पतीसह सासरच्या दिवाकर मुर्लीधर कुंदोजवार, छाया दिवाकर कुंदोजवार, सुमीत दिवाकर कुंदोजवार, व्यंकटेश मुर्लीधर कुंदोजवार, सतिश चंद्रकांत कुंदोजवार, पुनम सतिश कुंदोजवार सर्व रा. आष्टी तसेच पल्लवी सुरेश वैरागडवार रा. नागपूर या सात जणावर गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेमध्ये पराग दिवाकर कुंदोजवार याला पोलिसांनी अटक केली व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती पोलिस कोठडी संपली असता दिनांक १८ सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या पराग यांचे संबंध असलेली पल्लवी वैरागडवार हिला नागपूर येथून अटक करण्यात आली व आज दिनांक २० ऑगस्टला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज दि.२१/८/२०२५ ला पल्लवी ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे
बाकी कुंदोजवार परिवारातील सहा जणावर कारवाई होणार काय? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे करीत आहेत.