आष्टीच्या जिल्हा परिषद शाळेच्या आवाराभोवती घनकचऱ्याचा सडा
आष्टीच्या जिल्हा परिषद शाळेच्या आवाराभोवती घनकचऱ्याचा सडा
आझाद समाज पक्षाचा प्रशासनाला इशारा
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका, स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करा अशी मागणी
आष्टी:
आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची अवस्था दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक होत चालली आहे.
शाळेच्या आवाराभोवती घनकचऱ्याचा प्रचंड साठा झाल्याने दुर्गंधी पसरली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे व पुढे चालून गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या अस्वच्छ वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद समाज पक्षातर्फे पंचायत समिती चामोर्शीचे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शाळेच्या परिसरातील घानकचरा तात्काळ हटवावा संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच शाळेच्या आवारात पोलिस विभागाच्या गाड्यांचे अतिक्रमण त्वरित हटवावे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी आझाद समाज पक्षाचे जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, आनंद बोरकर, भाऊराव खोब्रागडे, छोटू भाऊ खोब्रागडे यांच्यासह शहरातील पदाधिकारी
व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, शाळेच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्यासोबत मिळून तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही पक्षाने दिला आहे.